जयंती प्रधान
जंयती प्रधान यांचा पर्यटन हा सर्वात आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना त्या आपले पती व लेखक जयप्रकाश प्रधान यांच्यासह भेटी देत असतात. तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पतीपत्नीचे पाय लागले आहेत. ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा '१२ दिवसांत १० देश' या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत : आखून केला असल्याने पर्यटनाच्या व्यापक अनुभवाने ते संपन्न आहेत.