Cart is empty
हिनाकौसर खान
केवळ पेशानेच नाही, तर वृत्तीनंही खरी पत्रकार! हिनाला भेटलं की तिच्या मधाळ हास्यात आणि तितक्याच हसऱ्या-बोलक्या डोळ्यात गुंतून पडल्यागत होतं. वागता-बोलताना हिनाच्या ठायी असलेला तिचा मृदूपणा लिखाणाच्या पातळीवर नाहीसा होतो. त्या बाबतीत मात्र ती विचारपूर्वक ठाम असते. हिनाने जाणिवपूर्वक मुस्लिम समाजाबद्दलचं सडेतोड लेखन अनेक माध्यमांमधून केलं. तिला त्याविषयी बोलणं-लिहीणं स्वतःची जबाबदारी वाटते. रिपोर्ताज, मुलाखती, कथा, कादंबरी, कविता, ललित, स्फूट असे अनेक दमदार घटक तिच्या लिखाणाच्या भात्यात आहेत. तिच्या एका कथेवर कोंकणी भाषेत सिनेमाही निर्माण झाला आहे. हिनाने फेसबुकवर चालवलेला 'भिंतीशी मारलेल्या गप्पा' हा हॅशटॅग त्याच्या संवादी आणि विचारप्रवर्तक लिखाणामुळे लोकप्रिय झालाय.