गुंजन पोरवाल

दिवसा अभियंता आणि रात्री साहित्यिक असलेले गुंजन पोरवाल यांना भारतीय मिथके विशेषतः रामायण आणि महाभारताबद्दल विशेष आकर्षण आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कानपूर) येथून २००२ साली पदवी प्राप्त झाल्यानंतर गुंजन यांनी अभियंता म्हणून बहुराष्ट्रीय कंपनीत काम केले आणि त्या कामासह साहित्यिक लेखनदेखील केले. पत्नी, मुले आणि माता-पित्यांसह गुंजन पुणे येथे वास्तव्यास आहेत. 'अश्वत्थामा'ज रिडेप्शन : द राइज ऑफ दंडक' ही त्यांची पहिलीवहिली कलाकृती आहे. 'अश्वत्थामा'ज रिडेंप्शन द बो ऑफ रामा' हा पुढील अध्यायही प्रकाशित झाला आहे आणि मराठीतून तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे.