गजेंद्र अहिरे

"मराठी चित्रपट क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे गजेंद्र अहिरे, विनोदी आणि करमणूकप्रधान चित्रपटांनी मराठी चित्रपटक्षेत्र व्यापलेले असताना, गजेंद्र अहिरेंनी सामाजिक आणि स्त्रीप्रधान विषय संवेदनशीलतेने मांडले. त्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुळात नाटककार म्हणून या क्षेत्रात आल्यानंतर प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटके गजेंद्र यांनी सादर केली. आणि मग आपल्या चित्रपटांतही अनेक वेगवेगळ्या कथांमधून जगण्यातील वेदना ठळक पद्धतीने मांडत या दिग्दर्शकाने आपला वेगळा ठसा उमटवला. आजपर्यंत मराठी आणि हिंदी मिळून एकूण ६० सिनेमे गजेंद्र यांनी पूर्ण केले आहेत. आणि आता भारताबाहेरील अनेक प्रयोगशील, तसेच प्रस्थापित कलाकारांसोबत नवनवीन प्रयोग ते चित्रपटांमध्ये करत आहेत. केवळ चित्रपट दिग्दर्शक एवढीच ओळख मर्यादित न ठेवता, गजेंद्र यांनी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, तसेच नृत्य दिग्दर्शन या सगळ्या बाजू उत्तमपणे निभावल्या आहेत. हिंदी आणि उर्दू भाषेची उत्तम जाण असलेल्या या अवलियाने आजपर्यंत अनेक हिंदी आणि मराठी कविताही लिहिल्या आहेत. त्यातील काही निवडक हिंदी कवितांचा संग्रह 'आधा पागल' नावाने प्रकाशितही झाला आहे. चित्रपट रसिकांसोबतच शासकीय पातळीवरही गजेंद्र अहिरेंचा यथोचित गौरव झाला आहे. आजपर्यंत सिनेमासाठी २१ महाराष्ट्र राज्य पुरस्कार, २ राष्ट्रीय पुरस्कार, ५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, २ फिल्मफेअर पुरस्कार, ७ वेळा इंडियन पॅनोरमामध्ये निवड अशा भरघोस पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. उत्तम कथेला चित्रपटात ढाळून सतत एका सर्जनशील प्रक्रियेत राहण्याचा ध्यास या कलाकाराला लागला आहे. त्याच्या या ध्यासातून भारतीय सिनेसृष्टीत निश्चितच उत्तम सिनेमांची भर पडत राहील."

लेखकाची पुस्तकं

SaleFeatured

स्टोरी टेलर


गजेंद्र अहिरे


स्टोरी’ टेलर’ हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी दिग्दर्शकाचा सर्जनशील प्रवास होय. दिग्दर्शक म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या साठ चित्रपटांपैकी

१२ निवडक चित्रपटांच्या निर्मितीमागच्या कथा हे पुस्तक सांगतं.

कथालेखन, निर्मात्याचा शोध, कलाकार निवड, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, प्रसिद्धी अशा अनेक आघाड्यांवर चित्रपट दिग्दर्शकासमोर असलेली आव्हानं या पुस्तकातून आपल्याला समजतात.

प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीशी अनेक रंजक किस्से आणि बरे-वाईट अनुभव यांचं नातं जुळलेलं असतं… ते किस्से, ते अनुभव सांगता सांगता गजेंद्र दिग्दर्शक म्हणून या सगळ्या सिनेमांच्या ‘मेकिंग ‘कडे पुन्हा एकदा बघतात आणि स्वतःला तपासतात. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आघाडीचे कलाकारही पुस्तकात या स्टोरी’ टेलर ‘विषयी मनमोकळेपणे बोलतात.

एकंदर सांगायचं तर, सिनेरसिक आणि अभ्यासक यांच्या हाती या पुस्तकाच्या निमित्ताने मोठा ऐवज पडणार आहे. तो ऐवज चित्रपटरसिकांना रंजक तर वाटेलच; पण त्याचबरोबर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणारे आणि चित्रपटनिर्मितीच्या वेगवेगळ्या विभागांत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच या क्षेत्रातले नवोदित अशा सगळ्यांसाठी स्टोरी’ टेलर’ जणू संग्राह्य असं ‘गाइड’ही ठरणार आहे.



 

Original price was: ₹595.00.Current price is: ₹540.00. Add to cart