फारुक एस. काझी

फारुक एस. काझी सांगोला येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास आणि शिक्षणशास्त्रात एम.ए. केलं असून डी.एड., बी.एड., डी.एस.एम. इ. पदव्या संपादन केल्या आहेत. बालसाहित्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून पालकत्वावरही ते नियमित लेखन करतात. मराठी बालसाहित्यात उपेक्षित राहिलेल्या समाजाच्या जाणिवा, परिसर, भावभावना त्यांनी आपल्या कथांतून मांडताना बालकथांचा एक नवीन अनुबंध आकारास आणला आहे. तात्पर्य देणारे, संस्कार करणारे लेखन टाळून मुलांना वाचनाचा आनंद देणारे आणि वाचताना त्यांना प्रश्न पडतील, ते विचार करतील आणि स्वत: काही शोधून काढतील असं साहित्य निर्माण करण्यास ते आग्रही आहेत.