फराज अहमद
लेखक फराझ अहमद हे इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत . दीर्घ काळ पत्रकारितेत असलेल्या अहमद यांनी गुन्हेगारी क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत अनेक प्रांतांत बातमीदारी केली आहे . ' द इंडियन एक्सप्रेस ' पासून त्यांची पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू झाली . त्यानंतर ' द पायोनिअर ' , ' द डेक्कन क्रॉनिकल ' , ' द एशियन एज ' आणि चंदीगढचा ' द ट्रिबुन ' या वर्तमानपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे . संसदेच्या कामकाजाचं वार्तांकन करताना त्यांना भारतातील निम्नवर्गीयांच्या राजकारणामध्ये अधिक रस निर्माण झाला . व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारून , त्यानुसार देशातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांना आरक्षण देण्याची घोषणा केली . तेव्हापासून अहमद यांनी या राजकीय प्रवाहाकडे सूक्ष्म नजरेने पाहायला सुरुवात केली .