डॉ. संदेश मयेकर

डॉ . संदेश मयेकर हे टफ्ट्स विद्यापीठ , बॉस्टनचे टी.एम.डी आणि 'आरोफेशियल पेन' या विषयातले पदव्युत्तर पदवीधर असून , त्यांनी अमेरिकन बोर्डाची दंतसौंदर्यशास्त्रातली ( Aesthetic Dentistry ) पदविका प्राप्त केली आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील दंतवैद्यकशास्त्र महाविद्यालयामध्ये दंत पुनरुज्जीवन विभागाचे ते साहाय्यक प्राध्यापक आहेत. भारताच्या लष्करातील वैद्यकीय सेवा खात्याचे माननीय सल्लागार आहेत. डॉ. मयेकर दंत-शल्यचिकित्सक असून बहुविध पद्धतीने दंतरुग्णाच्या चेहऱ्याचं सौंदर्य राखण्याचे आणि वाढवण्याचे उपाय करतात. फेमिनाच्या सौंदर्यस्पर्धेमध्ये हास्यासाठी वेगळे गुण देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली आणि गेल्या दोन दशकांपासून ते या स्पर्धेचे सल्लागार आहेत . डॉ. मयेकर यांच्या ध्यासामुळे आणि दूरदृष्टीमुळे भारतामध्ये दंतविषयक सौंदर्यशास्त्राची विचारसरणी सुरू झाली. दंतवैद्यकशास्त्रातल्या सौंदर्य आणि सौंदर्यप्रसाधन शाखेच्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. आशियातील दंतवैद्यकशास्त्रातल्या सौंदर्य आणि सौंदर्यप्रसाधन संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसंच ते भारतीय दंतशास्त्रातल्या मस्तक - चेहऱ्याच्या सौंदर्यशास्त्राच्या संस्थेचे तसंच सर्वसामान्य दंतशास्त्राच्या भारतीय संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत .तसेच युरोप आणि अमेरिकेच्या दंतवैद्यकशास्त्रातल्या सौंदर्य आणि सौंदर्यप्रसाधन संस्थेचे ते सन्माननीय सदस्य आहेत . 'फेमिना' मासिकामध्ये गेल्या दहा वर्षांपासून दातांविषयी एक सदर लिहीत आहेत . पाच हजार शालेय मुलांची दातांची तपासणी करून दात किडण्यावर नियंत्रण कसं ठेवावं यावर महत्त्वाचं संशोधन केलं आहे. अनेक सेलिब्रिटींचे ते दंतवैद्य असून मिश्कील व खुमारदार शैलीत त्यांनी आपले अनुभव लिहिले आहेत.