डॉ. मोहन द्रविड
परिचय डॉ . मोहन द्रविड : १ ९ ६७ साली वयाच्या १८ व्या वर्षी व्ही.जे.टी.आय् . मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी . दोन वर्ष लार्सन अँड टुब्रोच्या स्विचगिअर विभागात प्रीप्लॅनिंग इंजिनिअर म्हणून नोकरी केल्यानंतर १ ९ ६ ९ मध्ये अमेरिकेस प्रयाण . तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एम्.एस् . केल्यानंतर थिअरॅटिकल फिजिक्समध्ये कार्य . कन्डेन्स्ड मॅटरमधील अँटीफेरोमॅग्नटिझम या विषयात पीएच.डी. प्राप्त . भारतात हीट ट्रिटमेंटसाठी लागणाऱ्या भट्टया बनवणाऱ्या क्षेत्रात नोकरी आणि नंतर व्यवसाय . काही वर्ष रिअल इस्टेटमध्ये तर काही वर्षे शिक्षक पेशात असे अनेक विसंवादी व्यवसाय . जगातील अनेक देशात भ्रमण . व्हिएतनाम युद्धकालीन चालू असलेल्या विद्यार्थ्यांतील धामधुमीच्या चळवळीत थोडा सहभाग . त्या निमित्ताने समकालीन युद्धविरोधी विद्यार्थीदशेतील बिल क्लिंटन यांचा येल युनिव्हर्सिटीत लांबून परिचय . दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक . गेली पाच वर्षे लेखनकार्यात . ' युवंता ' ही एक कादंबरी प्रकाशित झाली आहे . नवल , मोहिनी अशा मासिकांमध्ये लेख आणि कथा प्रसिद्ध झाल्या आहेत .