डॉ. मीना वैशंपायन
मुंबई विद्यापीठातून मराठी हा विषय घेऊन वैशंपायन यांनी पीएचडी केली असून मराठी व संस्कृत या विषयांमध्ये एम.ए. केलं आहे. दुर्गा भागवत यांच्या ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास हा पीएचडीचा विषय होता. गेली दोन दशकं विविध नियतकालिकं आणि दिवाळी अंकांमधून समीक्षा पर्व ललित लेखन करीत आहेत. सरस्वती सन्मान, जनस्थान पुरस्कार, चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, केशवराव कोठावळे पुरस्कार यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार समित्यांवर त्यांनी मानद परीक्षक म्हणून काम केलं असून त्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या मानद उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत.