डॉ. कमला सोहोनी
डॉ. कमला सोहोनी या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ असून त्यांचा जन्म १८ जुलै, १९११ रोजी झाला. त्यांनी १९३७ साली मुंबई येथून एम.एस्सी. केलं आणि १९३९मध्ये केंब्रिज, इंग्लंडमधून पीएच. डी.ची पदवी प्राप्त केली. त्यांना अनेक शिक्षण शिष्यवृत्ती मिळाल्या असून त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत :
(१) सत्यवती लल्लूभाई सामळदास शिष्यवृत्ती, १९३१, (२) टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप, बॉम्बे प्रेसिडेन्सी, १९३३, (३) स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप, १९३७, (४) सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप, १९३७, (५) इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्र्हिसटी विमेन (यू.एस.ए.) ची ट्रॅवलिंग स्कॉलरशिप, १९३८. त्यांना पुढील सन्मान प्राप्त झाले आहेत. लीग ऑफ नेशन्समध्ये भारत, इंग्लंड व अमेरिका या तिन्ही देशांच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व, (लक्झेंबर्ग) १९३८.
त्या राष्ट्रपती पदक विजेत्या असून त्यांच्या संशोधनकार्याचा पुढीलप्रमाणे सन्मान करण्यात आला आहे. (१) इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर : दुधातील व कडधान्यातील प्रथिनांचे पृथक्करण. ह्युमनायझेशन ऑफ बफेलो मिल्क. (२) सर विल्यम डन इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री, केंब्रिज: वनस्पती पेशींमध्ये ‘सायटोक्रोम’चा शोध. या शोधाबद्दलच केंब्रिज विद्यापीठाने पीएच. डी. पदवी दिली. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ जगतात नाव झाले. (३) न्यूट्रिशन रिसर्च लॅब, कुन्नूर : तोसला यीस्ट जीवनसत्त्व “प”. (४) इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई : कडधान्यांमधील ट्रिप्सीन इनहिबिटर्स. आरे, दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत, वासरांचा आहार, धान-आट्यातील पौष्टिक घटक, नीरा या पेयामधील पौष्टिक घटक, त्यांचे माणसावर परिणाम. नीरा संशोधनाबद्दल त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले.