डॉ. जयदेव पंचवाघ
डॉ. जयदेव पंचवाघ हे पुणे येथे गेली २२ वर्ष न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारताच्या आणि जगातल्या विविध भागांतून आलेल्या अनेक रुग्णांवर त्यांनी आजवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. या अवघड शस्त्रक्रिया करताना लागणारं हस्तकौशल्य व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य रीतीने सांगड घातली जावी यावर त्यांचा मुख्य भर असतो. जगभर विकसित होणारं हे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध व्हावं यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जरी कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनेक वेळा त्यांचं संशोधन मांडलं आहे. तसंच राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्यही आहेत.