डॉ. हेमा क्षीरसागर

प्रा. डॉ. सौ. हेमा कमलाकर क्षीरसागर यांनी एम्.ए. (संस्कृत), एम्.एड्., पीएच्.डी. असं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे अध्यापन केलं असून त्या प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या संस्कृत भाषेच्या तज्ज्ञ असून त्यांनी अनेक महत्त्वाचे अनुवाद केले आहे. त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाला महत्त्वाची पारितोषिकं मिळाली होती. तसंच त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.

लेखकाची पुस्तकं

१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती

‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्रीय मागोवा


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
प्रा. डॉ. सौ. हेमा कमलाकर क्षीरसागर यांनी एम्.ए. (संस्कृत), एम्.एड्., पीएच्.डी. असं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे अध्यापन केलं असून त्या प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या संस्कृत भाषेच्या तज्ज्ञ असून त्यांनी अनेक महत्त्वाचे अनुवाद केले आहे. त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाला महत्त्वाची पारितोषिकं मिळाली होती. तसंच त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.

भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’


125.00 Add to cart