डॉ. गणेश राऊत
डॉ. गणेश राऊत यांनी इतिहास या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांचा अध्यापन क्षेत्रात १७ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या ते एच.व्ही.देसाई महाविद्यालय, पुणे येथे इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते ‘बालभारती’चे सदस्य असून विविध इयत्तांची पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रम-आखणी यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.
राऊत हे मुक्त पत्रकार म्हणूनही कार्यरत असून त्यांची पत्रकारितेबद्दलची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तसंच, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेच्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर कोर्समध्ये मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी इतिहासविषयक ९ संदर्भग्रंथांचं लेखन आणि १६ पुस्तकांचं संपादन केलं आहे.
त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे प्रकाशित ‘दत्तक गावांचा इतिहास’ या पुस्तकाच्या दोन खंडांचं संकलन आणि संपादन केल आहे. महाराष्ट्रात त्यांची इतिहास विषयावर १५००हून अधिक व्याख्यानं झाली आहेत. तसंच, मोडी लिपी, हेरिटेज वॉक, किल्ले दर्शन अशा कार्यक्रमांच्या आखणीमध्ये त्यांचा सहभाग असतो.