दीप्ती राऊत
दीप्ती राऊत या पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर त्या वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन करतात. ‘ग्राउंड रिपोर्टस्’च्या माध्यमातून विविध समाजसमूहांचे अंधारातील जगणं प्रकाशात आणणं, शासकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे मांडणं आणि सामाजिक बदलासाठी खारीचा वाटा उचलणं हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांना दै. लोकसत्तामध्ये वार्ताहर म्हणून तसेच आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीत नाशिक ब्युरो चीफ, आणि दिव्य मराठी या दैनिकात विशेष प्रतिनिधी या माध्यमातूनवार्तांकनाचा अनुभव आहे.
त्या ‘नॅशनल टेलिव्हिजन अॅवॉर्ड', ‘रामनाथ गोएंका अॅवॉर्ड', ‘मटा गौरव सन्मान', ‘वरुणराज भिडे उत्कृष्ट पत्रकार', इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित आहेत.