बिनायक बंदोपाध्याय
बिनायक बंद्योपाध्याय यांचा जन्म कोलकात्याचा. त्यांचे वडील कै. परेशनाथ हे कोलकात्यामधील सुप्रसिद्ध संस्कृत पंडित. बिनायक यांना कवितांची आवड. बंगाली भाषिक तरुणांमध्ये आश्वासक कवी असा त्यांचा नावलौकिक. त्यांची पहिली कथा 'उनिश-कुडी' मासिकात प्रकाशित झाली. पहिली कादंबरी २००७ साली 'शारदीय देश' या अंकात प्रकाशित झाली. कविता, कथा, कादंबऱ्या आणि प्रबंध अशा सगळ्या प्रकारचं लेखन ते करतात. कवी आणि कादंबरीकार या नात्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 'कृत्तिवास पुरस्कार', पश्चिम बंगाल अकादमीचा 'शक्ती चट्टोपाध्याय पुरस्कार', 'शर्मिला घोष साहित्यिक पुरस्कार', 'भाषानगर पुरस्कार', यासारख्या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. २०१४ साली आयोवा, यु.एस.ए. येथे झालेल्या इंटरनॅशनल राईटर्स प्रोग्रॅममध्ये त्यांनी भारताचं आणि बंगाली भाषेचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी आजपर्यंत पंचविसहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि त्यांचे सोळा कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.