भा.ल. महाबळ
मराठी साहित्यात ज्येष्ठ विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भा.ल. महाबळ यांनी विपुल लेखन केलेलं आहे. वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात. मुंबईच्या माटुंगा परिसरातील 'व्हीजेटीआय’या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते वयाच्या ६०व्या वर्षी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. १९४९ ते १९५८ या काळात म्हणजे महाबळ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या आणि नंतर सांगलीच्याच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी विलिंग्डन कॉलेजातून मी बी.एस्सी (ऑनर्स) ही पदवी घेतली, दोन शाळांत शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर मिरजेच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग) ही पदवी मिळवली. विद्यार्थी असताना त्यांनी, अमृत, आलमगीर, किर्लोस्कर-स्त्री-मनोहर, तारका, रंजन, वाङ्मयशोभा, विविधवृत्त, सकाळ, संजय, सह्याद्री, स्वराज्य, हंस-मोहिनी-नवल, या नियतकालिकातून कथा, लेख, कविता लिहिल्या. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले असून इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.