अतुल देऊळगावकर

प्रकाशित पुस्तकं
1) 'डळमळले भूमंडळ' 'लॉरी बेकर' 'स्वामीनाथन भूकमुनीचा ध्यास 'बखर 2) पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची' 'विश्वाचे आर्त'
3) “न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात' सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा -
4)लॉरी बेकर टूथ इन आर्किटेक्चर' विवेकींची संगती
5)ग्रेटाची हाक 'तुम्हाला ऐकू येतेय ना?' बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी
6)ऐकता दाट पृथ्वीचं आख्यान ग्रंथाचिया द्वारी
7) निसर्गकल्लोळ मानवी अविवेकाचे अंतरंग

पुस्तकांचे झालेले अनुवाद
१)ग्रेटा कॉलिंग कॅन यु हिअर मी? डॉ. मधुकर देशपांडे : -
2)जो कहें संवाद एलकुंचवार से डॉ. गोरख चोरात
3)एलकुंचवार अवरूनन्दिर्गे संवाद चंद्रकांत पोकळे,

पुरस्कार
1) कोलकाता येथील दै. 'स्टेट्समनचा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार
2)'लॉरी बेकर'साठी महाराष्ट्र फाऊंडेशनचा उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ पुरस्कार
3)दिल्ली येथील प्रेम भाटिया मेमोरियल ट्रस्टचा सर्वोत्तम पर्यावरणीय 4)पत्रकार पुरस्कार 'बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची' 5)महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार
6) 'विश्वाचे आर्त'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार
7)पद्मश्री विठ्ठलराव विखेपाटील समाजप्रबोधन पुरस्कार
8)केसरी मराठा ट्रस्टचा न. चि. केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार

संबोधन
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ सदस्यांसमोर 'हवामान बदल, आव्हाने आणि उपाययोजना मार्च २०१८ -

पर्यावरण व हवामानविषयक अमेरिका, फ्रान्स, सेनेगल, इंडोनेशिया, बांगला देश पाकिस्तान व नेपाळ आदी जागतिक परिषदांमधील सहभाग

लेखकाची पुस्तकं

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा

किल्लारी भूकंप..
तीस वर्षानंतरचा किल्लारी परिसर
पुनर्वसनाचा ताळेबंद

आपत्तीचक्राचा विळखा


अतुल देऊळगावकर


३० सप्टेंबर १९९३ची रात्र किल्लारी आणि परिसरातल्या रहिवाश्यांसाठी काळरात्रच ठरली! भूकंपांच्या हादऱ्यांनी काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं… जगाचं लक्ष वेधलं गेलं… काही तासांत तत्कालीन मुख्यमंत्र्यासह सगळं प्रशासन कामाला लागलं, मदतीचा ओघ सुरू झाला आणि नंतर ‘भव्य’ पुनर्वसनही झालं….

लेखक, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी या भूकंपानंतर झालेलं बचतकार्य, मदतकार्य, पीडितांची अवस्था, त्यांची मानसिकता आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अशा अनेक गोष्टी या पुस्तकात सविस्तर चित्रित केल्या आहेत. तसंच किल्लारी भूकंपाला आता काही वर्षं झाल्यानंतर तिथल्या पुनर्वसनाच्या स्थितीचाही चिकित्सक लेखाजोखा मांडला आहे.

या निमित्ताने देऊळगावकर यांनी आपत्ती ही दैनंदिन घटना झालेल्या आजच्या काळात जोखीम निवारण व उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी सूत्ररूप सुचवण्या केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ किल्लारीपुरते मर्यादित राहत नाही, तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडे एका व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला लावते.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची निकड अधोरेखित करणारं, डोळ्यांत अंजन घालणारं पुस्तक….

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा!



 

430.00 Add to cart