अरविंद गोखले

अरविंद व्यंकटेश गोखले यांनी ‘केसरी ते लोकसत्ता’ अशी सलग चार दशकांची पत्रकारिता केली आहे. त्यांनी केसरी आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी संपादक आणि लोकसत्ता या दैनिकाचे निवृत्त साहाय्यक संपादक ही पदं भूषवली आहेत. १९७९ साली लंडनच्या ‘कॉमनवेल्थ प्रेस युनियन’ची हॅरी ब्रिटन मेमोरिअल फेलोशिप मिळवून त्यांनी पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतलं. तसंच त्यांनी १९९८ साली वॉशिंग्टनच्या ‘द हेन्री स्टिम्सन सेंटर’ची फेलोशिप मिळवून भारत-पाकिस्तान संबंधांवर विशेष संशोधन केलं आहे. ‘पत्रकारिता अभ्यासक्रमा’चे ते मानद व्याख्याते आहेत. याच संशोधन काळात त्यांनी लष्करप्रमुखपदी जनरल परवेझ मुशर्रफ यांची नियुक्ती होणार असल्याची बातमी ‘केसरी’त सर्वप्रथम प्रसिद्ध केली. आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषत: भारत-पाकिस्तान संबंध हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी पाकिस्तानचा पाच वेळा दौरा केला आहे. तसंच अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन, यांसह पंधरा देशांचे अभ्यासदौरे केले आहेत. त्यांनी केसरीत १९७०पासून सलग आठ वर्षं ‘पाकिस्तानचे वार्तापत्र' हे साप्ताहिक सदर चालवलं. लोकसत्ता दैनिकात ‘दक्षिणायन’ हे सदर, तर ‘पाकिस्ताननामा’ आणि ‘अफपाकनामा’ ही दोन सदरं दिव्य मराठीत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या नावे अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत.

लेखकाची पुस्तकं

Explore Other Authors