अरुणा सबाने
एक संवेदनशील लेखिका, हळवी व्यक्ती आणि लढाऊ कार्यकर्ती... अरुणा सबाने यांच्या व्यक्तिमत्त्वाची अशी अनेक रूपे असली तरी 'स्वातंत्र्य' या मूल्यासाठी जिवाची बाजी लावणारे धगधगते स्त्रीत्व हे त्यांचे अस्सल रूप आहे. 'आकांक्षा'सारखे मासिक असो, 'माहेर'सारखी संस्था असो की 'दक्षिणायन'सारखं आंदोलन असो, त्यासाठी अरुणा सबाने झोकून देऊन काम करतात. त्यांचं लेखन, मग ती कादंबरी असो, ललित लेखन असो की वैचारिक लेखन; त्या लेखनातील प्रत्येक शब्द स्त्रीत्वाच्या स्वाभिमानाने भारीत झालेला असतो आणि त्यांच्या कोणत्याही कृतीतील प्रत्येक क्षण हा स्त्रीत्वाचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असतो.
*लेखिकेचं प्रकाशित साहित्य,पुरस्कार,विशेष कार्य आणि सामाजिक कार्यामधील सहभाग याची माहिती पुस्तकाच्या शेवटी दिली आहे.