अरुण गांधी
अरुण गांधी यांचा जन्म १९३४ साली दक्षिण आफ्रिकेत झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना भारतात त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्यासोबत राहण्यास पाठवण्यात आले. गांधीजींबरोबर ते तेव्हा अठरा महिने राहिले. अर्थातच त्या दरम्यान गांधीजींच्या अहिंसेच्या राष्ट्रीय मोहिमेचे ते साक्षीदार होते. नंतर १९५७ साली भारतात परतल्यानंतर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम पाहू लागले. आपली पत्नी सुनंदा हिच्या साथीने त्यांनी 'सेंटर फॉर सोशल युनिटी' या संस्थेची स्थापना केली. तसेच इ.स. १९९१मध्ये या उभयतांनी टेनेसी येथे ‘एम. के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉन व्हॉयलन्स' या संस्थेची स्थापना केली.