अनुराधा परब

एम. ए. (मराठी साहित्य) * एम.ए. संस्कृत (प्राचीन भारतीय विद्या विषयात तज्ज्ञता) ■ तीस वर्षांहून अधिक पत्रकारितेचा अनुभव सदरलेखिका, निवेदिका सूत्रसंचालिका, व्हॉइस आर्टिस्ट १. मुंबई तरुण भारतमध्ये सलग दहा वर्षे पूर्णवेळ पत्रकार व पुरवणीचं संपादन २. मुक्त पत्रकार म्हणून २००४ पासून लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, युवा सकाळ, नवशक्ती, सामना, प्रहार, पुण्यनगरी आदी वृत्तपत्रांतून विपुल लेखन ३. दिवाळी अंकांचं संपादन तसेच विविध दिवाळी अंकांतून वेगवेगळ्या विषयांवर लेखन ४. आकाशवाणी वनिता मंडळ, ऐसी अक्षरे आदी विभागांमध्ये ललित लेखन, संवाद लेखन, मुलाखती, ग्रंथपरीक्षण-वाचन ५. अल्फा मराठी, सह्याद्री वाहिनीवर मुलाखतकार म्हणून काम ६. चतुरंग प्रतिष्ठानच्या २००८ व २००९ सालच्या जीवनगौरव स्मरणिकेत लेखन ७. किमान १५ वर्षं साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवर आधारित कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन प्रकाशित पुस्तकं १. प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत (चरित्र) ज्योत्स्ना प्रकाशन २. डॉ. प्रकाश बाबा आमटे (असा घडला चित्रपट)- चतुरंग, मौज प्रकाशन ३. गाथा साष्टीची इंडिया स्टडी सेंटर ४. जीवनोपयोगी संख्याशास्त्र (शब्दांकन) (केशव भिकाजी ढवळे प्रकाशन) ५. मनःशक्ती (शब्दांकन) पुरस्कार १. दया पवार पुरस्कार (एकता कल्चरल अकादमीच्या वतीने) २०१४ २. 'प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत' या चरित्राला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने २०१८चा उत्कृष्ट ललित लेखनाचा विद्याधर गोखले स्मृति पुरस्कार