अनंत सामंत
सामंतांच्या जगण्याचे किंवा साहित्याचे वर्गीकरण होऊ शकलेले नाही, कारण कुठल्याही एका बाटलीत भरावे आणि लेबल चिकटवावे असे हे रसायन नाही. त्यांची प्रत्येक कथा, कादंबरी समुद्र आणि मातीमध्ये जगलेल्या त्यांच्या वादळी जीवनाचे चित्र प्रतिबिंबित करते . तंत्रानुसार आधी पटकथा लिहिली जाते, मग ती' शूट केली जाते. सामंतांच्या लेखणीत दडलेला कॅमेरा आधी 'शूट' करतो मग ते चित्र कागदावर मुद्रित होते. जरी ते स्वतःला' सामान्य माणूस ' म्हणत असले तरी, त्यांच्या साहित्यातील न वाचलेल्या, न पाहिलेल्या विश्वाने वाचकांना आणि समीक्षकांना नेहमीच चकित केले आहे.