अमिता नायडू
शिक्षण बीए. इकोनॉमिक्स, पत्रकारिता डिप्लोमा, जर्मन भाषा सर्टिफिकेट कोर्स. प्राथमिक शिक्षिका सर्टिफिकेट कोर्स, पत्रकार म्हणून काही वर्तमानपत्रात काम. नंतर मुक्त पत्रकार म्हणून 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाइम्स', 'मराठवाडा', 'लोकमत', 'साप्ताहिक सकाळ' यांसह मराठीतल्या बहुतांश प्रादेशिक व शहरी वर्तमानपत्रं व साप्ताहिकं, व्हिडीओ दैनिक यामधून लेखन. आकाशवाणी व 'युवावाणी'मध्ये काही मुलाखती व इतर कार्यक्रम, 'युनिक फीचर्स' या संस्थेत उपसंपादक म्हणून काम. अठरा वर्षांखालील वंचित मुलांसाठी काम.
प्रकाशित साहित्य: तीन अनुवाद, दोन स्वतंत्र लेखनाची पुस्तकं आणि लहान मुलांची अनेक पुस्तकं.




