अ‍ॅड. निशा शिवूरकर

गेल्या चाळीस वर्षांपासून स्त्रीमुक्ती चळवळीतील कृतीशील कार्यकर्ती. राष्ट्रसेवा दल, समता आंदोलन व समाजवादी जनपरिषदेद्वारे लोकशाही समाजवादासाठी कार्यरत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर कृतीसमितीच्या उपाध्यक्ष. अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्राच्या अध्यक्षा. असंघटित कष्टकऱ्यांना संघटित करण्यात सहभाग. समता आंदोलनाने परित्यक्तांच्या प्रश्नांवर देशातील पहिली परिषद २० मार्च १९८८ रोजी संगमनेरला घेतली. या परिषदेच्या प्रमुख आयोजक. हिमालय मोटर रॅली विरोध, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, एन्रॉन हटाव, शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश इ. विविध आंदोलनांमध्ये तुरुंगवास. 'अरुण लिमये युवा जागर पुरस्कार, नवनीतभाई शहा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, माई गुजराथी पुरस्कार, साथी मधू लिमये कार्यकर्ता गौरव पुरस्कार, डॉ . अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित.