अभिजित थिटे
गेल्या १४ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अभिजित थिटे कार्यरत आहेत. ‘तेजशलाका इरेना सेंडलर’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद झाला असून अमेझॉनने जाहीर केलेल्या सर्वोत्तम व्यक्तिमत्त्वांवरील सर्वोत्तम पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक सहाव्या स्थानावर होतं. या यादीतले ते एकमेव भारतीय लेखक आहेत. त्यांनी विविध पुस्तकांचे अनुवाद केले असून भारतीय रेल्वेवरील ‘द टर्न अराउंड स्टोरी’ या पुस्तकाचं शब्दांकनही केलं आहे. कुंभमेळ्यावर आधारित ‘अनंताचा प्रवास’ या शॉर्ट फिल्मचे त्यांनी लेखन केलं असून त्यांची ‘मुक्ती’ ही कादंबरी प्रकाशित आहे.