केतन माणगांवकर
केतन प्रभाकर माणगांवकर हे गेली १६ वर्ष मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. बहुचर्चित आणि प्रसिद्ध अशा 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाचे ते क्रिएटिव्ह डायरेक्टर तसेच प्रोजेक्ट हेड आहेत. बिग बॉससह अनेक प्रसिद्ध रिअॅलिटी शोजची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळल्यामुळे आज मराठी टीव्ही जगतात त्यांचं नाव अग्रगण्य दिग्दर्शक म्हणून घेतलं जातं.
पूर्ण वेळ दिग्दर्शक म्हणून कार्यरत असले तरी त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. रिअॅलिटी शोजध्ये लागणाऱ्या स्क्रिप्ट व्यतिरिक्त स्फुटलेखन, कथालेखन, चारोळ्या, शेर असे विविध लेखनप्रकार त्यांनी हाताळले आहेत. पण त्यांना कादंबरी हा लेखनप्रकार सगळ्यात जास्त चॅलेजिंग वाटतो.
'#जिप्सी' ही त्यांची पहिलीच कादंबरी असून या कादंबरीतून त्यांची लेखनाबद्दलची पॅशन दिसून येते.