ओन्ली वन क्लू
₹340.00
लेखक : राजेंद्र मुरलीधर भामरे
सहाय्यक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त)
सिद्धहस्त अनुभवी पोलीस अधिकारी
राजेंद्र मुरलीधर भामरे,
(सहायक पोलीस आयुक्त – सेवानिवृत्त)
यांनी धडाडीने आणि कल्पकतेने केलेल्या तपासाच्या सत्यकथा म्हणजे हे पुस्तक. ते लिहितात, ‘अपराध्याला शोधून काढणं हे जसं तपास अधिकाऱ्याचं काम असतं, तसंच निरपराध्याचं रक्षण करणं हेही त्याचंच काम असतं’ यावरून त्यांचा पोलीस तपासाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो.
विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या ३३ सत्यकथा तपशिलात सांगता सांगता, भामरे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारी जगतात चोरी, दरोडे ते सायबर गुन्हे असे लक्षणीय बदल कसे होत गेले याचा परामर्श या पुस्तकातून घेतात. तसंच खबरे, इलेक्ट्रॉनिक फूटप्रिंट्स, व्हिसेरा यांसारख्या गोष्टी पोलीस तपासात किती महत्त्वाच्या असतात हे ते विशद करतात.
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनी ‘सायबर साक्षर’ होणं का महत्त्वाचं आहे, हेही ते स्पष्ट करून सांगतात. परिस्थितीचा नेमका अभ्यास, लोकसंपर्क, विश्वास-संपादन, कल्पनाशक्ती, बहुश्रुतता यांच्या साहाय्याने पोलीस अधिकारी तपासाच्या निष्कर्षापर्यंत कसे पोचतात हे पुस्तकातून लक्षात येतं.
पोलिसी पंचनाम्यातला कोरडेपणा किंवा रहस्यकथांमधली अतिरंजितता टाळून सांगितलेल्या वास्तववादी सत्यकथा… ओन्ली वन क्लू !
















Reviews
There are no reviews yet.