महानगर, निम-शहर : सांस्कृतिक पर्यावरणाचा धांडोळा (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा मुंबई : १९८४ माझा जन्म १९५६चा. १९८४ मध्ये अंतिम निर्णय घेतला, कसंही करून मुंबई सोडून बाहेर पडायला हवच.  तेव्हा विचार केला, ‘१९५६ ते १९८४ पर्यंतच्या २८ वर्षांच्या वास्तव्यात, मुंबईत जे जे काही चांगलं आहे, ते सर्व मिळून पावलेलो आहे.   परंतु, या शहराची गती, विशेष करून प्रचंड गर्दी असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज येऊन-जाऊन [...]

लिहिण्याचे प्रयोग (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा माझे लिहिण्याचे प्रयोग माझ्या जगण्याच्या प्रयोगांशी आजवर बरेचसे समांतर राहिलेले आहेत. किंवा जगण्याच्या अनेक प्रयोगांमधला एक मह्त्त्वाचा प्रयोग लिहिणं असंही असू शकतं. आपण आजवर जे काही केलं, अनुभवलं, शिकलो, प्रवास केले ते लिहिण्याकरताच होते का, असा प्रश्न मला अनेकदा पडतो आणि प्रत्येकच लिहिणाऱ्याला पडत असावा. या ना त्या प्रकारे आपलं जगणं लिहिण्यात [...]

माजी सरपंच (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा नोकरीच्या निमित्ताने इकडे मुंबईकडे आलो आणि गावाला जणू पारखाच झालो. तसं गावाकडे जाणं व्हायचं अधूनमधून कारणोकारणे निमित्तमात्रे. पण, ते कसं, उभ्या उभ्या गेले, निमित्तापुरते थांबले की, लगोलग उलटपावली परत. ना अवांतर भेटीगाठी, ना ख्यालीखुशाली. गेलो काय अन्‍ आलो काय. यावेळी मात्र खूप वर्षांनंतर चांगली आठ दिवसांची रजा काढून निवांतपणे घालवण्यातच गेले; पण, [...]

माझ्या झेन गुरूंच्या आठवणी (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा माझ्या झेन गुरूंचे नाव सान-सा-निम!  ते महान झेन गुरू होऊन गेले.  ते कोरियन होते. पहिल्यांदा ते जेव्हा अमेरिकेत- प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंडमध्ये आले, तेव्हा ते एका लॉन्ड्रोमॅटमध्ये मशिन रिपेअर करायचचे काम करीत असत.  बॉस्टन युनिव्हर्सिटी तिथून जवळच होती आणि तिथले विद्यार्थी कपडे धुण्यासाठी तिथे  येत असत. त्यांच्याशी ते आपल्या मोडक्या इंग्लिश भाषेमध्ये गप्पा मारत असत.  काही दिवसांनी [...]

त्यांच्या ‘मनात’ला भारत (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा मानवी मेंदू ही फार मजेदार गोष्ट आहे!  कुठल्याही गोष्टीबद्दल ऐकलं, की आपण त्याचं डोळ्यापुढे चित्र उभं करतो.  कुठेही जातांना, आपण त्या जागेविषयी तिथल्या माणसांविषयी ऐकीव किंवा वाचून कळलेल्या माहितीनुसार मनांत काही आराखडे बांधतो. हल्ली इंटरनेटचा जमाना आहे;  त्यामुळे अनेकदा आपण ‘व्हर्चुअल टूर’पण करू शकतो; आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय पाहायला मिळेल, याचे [...]

विधवा कलर (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा थोडंथोडं समजायला लागण्याचं ते वय होतं. घरी पाहुणे आले होते. बहुधा आत्याकडचे. सगळे खरेदीला निघाले होते. ती घरीच असणार होती. नेहमीप्रमाणे रांधा वाढा उष्टी काढा... ही जबाबदारी निभावत आत्येबहिणीने तिला विचारलं, “मामी, तुला साडी घ्यायची आहे, कोणत्या रंगाची आणू?”  ती पटकन उद्गारली, “आण कोणतीही ‘विधवा कलर’ची...” ‘विधवा कलर?’ तोपर्यंत कधीही न ऐकलेला; [...]

आम्हाला तुझी चित्रं समजत नाहीत… (दिवाळी अंक)

"आम्हाला तुझी चित्रं समजत नाहीत..." मी अनेकदा ऐकलेलं हे वाक्य. मला नेहमी प्रश्न पडतो की, चित्रं समजणं म्हणजे नेमकं काय? चित्रांमधलं काय समजलं की चित्र समजलं असं म्हणता येईल? चित्राचा विषय समजला (म्हणजे हा समुद्र आहे, जंगल आहे, माणूस आहे) म्हणजे चित्र समजलं का? आणि हे जर खरं असेल तर माझी बहुतेक चित्रं समजणं अवघडच [...]
1 2