‘96 मेट्रोमॉल’ कादंबरीतील निवडक भाग
इमारतीवर त्याला एक निऑनसाइन दिसली. त्यावरची अक्षरं होती – ‘वेलकम टू 96, मेट्रोमॉल!’
इमारतीवर त्याला एक निऑनसाइन दिसली. त्यावरची अक्षरं होती – ‘वेलकम टू 96, मेट्रोमॉल!’
‘‘मुझे बच्चा नही चाहिये. तुझे पता है ऐसे घिनौने काम हम लोग नही करते. मगर पत्ती ना मिले तो…’’ सुराधाऱ्याने हेतूपूर्वक वाक्य अर्धवट सोडलं.
झुरांग तिला म्हणाला, “मी तुला विसरू शकत नाही.” त्यावर गौरी म्हणाली, “डोंट वरी. तिकडे गेल्यावर विसरून जाशील.”…
लेखकाची शब्दकळा बघितली की वाटतं, हा जन्मत: लिहिणारं बोट घेऊन आलाय अन् त्याने त्याची जाणीवपूर्वक मशागत केलीय…
नव्या पिढीच्या भाषेत लिहिणारे नव्या पिढीतीलच म्हणता येतील असे मराठीत जे काही मोजकेच लेखक आहेत, त्यात हृषीकेश यांचं नाव गाजतं आहे.
तोच म्हणाला, “मी तुझ्या स्वप्नात आलोय, मला तुला काहीतरी सांगायचंय. नाहीतर मी असाच अतृप्त राहीन.”
तोच एक भारदस्त बाई कल्पीवर खेकसली, ‘ये भवाने, जरा दम नाय का तुला? हो लांब. वहिनींचा पाय किती मुरगळलाय तुला कळत काय नाय? व्ह लांब…’
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.
भयकथा या फॉर्मची बलस्थानं, त्याची रचना, त्यातले बारकावे व त्याला येऊ शकणाऱ्या मर्यादा या सगळ्याची जाणीव त्यांना आहे