Reading Time: 1 Minutes (137 words)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मराठी कादंबरी साहित्यप्रकारात उल्लेखनीय सर्जनशील लेखनयोगदानाबद्दल हृषीकेश पाळंदे यांना २०२१चा साहित्य क्षेत्रातील ‘युवा गौरव’ पुरस्कार जाहीर झाला असून चाळीसपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. २५ हजार रुपये, मानपत्र असं त्याचं स्वरूप असतं. हृषीकेश यांचं टीम रोहनकडून मनःपूर्वक अभिनंदन!
सर्जनशील लेखन करण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे दिली जाणारी अभ्यासवृत्ती हृषीकेश यांना मिळाली होती. त्याअंतर्गत ते लडाखमध्ये जाऊन रााहिले होते. तिथल्या अनुभवांवर आधारित कादंबरी त्यांनी लिहिली. ती ‘झुरांगलिंग‘ या नावाने रोहन प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आली आहे.

झुरांगलिंग कादंबरीतील निवडक भाग
एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा!