186 | 978-93-80361-61-1 | Vyomkesh Part 1 | व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १ | प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर | Sharadindu Bandyopadhay | शरदिन्दु बंद्योपाध्याय | Ashok Jain | अशोक जैन | दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील! | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 204 | 21.6 | 14 | 0.9 | 200 | Suspense stories of popular Vyomkesh Bakshi character, also seen on Doordarshan | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 200 | VyomkeshBakshiRahasyakatha1.jpg | VyomkeshBakshiRahasyakatha1BC.jpg |
मालगुडीचा संन्यासी वाघ
आर.के. नारायण
अनुवाद : नंदिनी नारायण
आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!
गावतल्या कोंबड्या-बकर्या-म्हशींची शिकार करून गावकर्यांना त्रास देणार्या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. या `हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या `सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!
थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात.
या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते.
`मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा…मालगुडीचा `संन्यासी’ वाघ!
Reviews
There are no reviews yet.