34 | Vivahsohala Rukhvatache Padartha | विवाहसोहळा व रुखवताचे पदार्थ | Mangala Barve | मंगला बर्वे | विवाह-समारंभ हा आपल्या घरातील अतिशय आनंदाचा समारंभ. तो जबाबदारीने व यथासांग पार पडावा, त्यात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. हल्लीच्या कुटुंबात घरात अनुभवी वडीलमंडळी असतात असे नाही. त्यामुळे कुठली कामे व ती कशी करावी ह्याचा प्रश्न अनेकांपुढे पडतो. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे. लग्न ठरवताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, घरगुती पत्रे कशी लिहावी, साखरपुडा कसा साजरा करावा, साखरपुडयाला काय मेनू ठरवावा, लग्नपत्रिकेतील मजकूर कसा असावा ह्याविषयी खूप माहिती ह्या पुस्तकात दिली आहे. विवाहविधीसाठी कोणत्या वस्तू व किती प्रमाणात लागतील त्याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याखेरीज मंगलाष्टके, उखाणे, मुलीचे मनोगत व रुखवताचे नानाविध प्रकार दिले आहेत. लग्नाच्या वेळी मुलीसाठी काय तयारी करावी तेही सांगितले आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 116 | 21.6 | 14 | 0.7 | 110 |
Marriage preparations and recipes
|
Recipe | पाककला | 75 | Vivahsohala Rukhvatache Padartha.jpg | VivahsohalaRukhawatachePadarthaBC.jpg |
नारळाचे पदार्थ
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
समुद्रकिनार्यालगतच्या भागात जरी नारळ मोठया प्रमाणात पिकत असला, तरी नारळ स्वयंपाकासाठी सर्वत्रच विविध प्रकारे वापरला जातो. हा वापर केवळ चवीसाठी किंवा पदार्थातील एक पुरक जिन्नस म्हणून मर्यादित राहिलेला नाही. नारळाचा स्वतंत्रपणे वापर असलेल्या अनेक पाककृतींची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांनी अशा विविध पदार्थांचा शोध घेऊन, अनेक प्रयोग करून केवळ नारळाच्या पदार्थांचे हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकात नारळाचा वापर असलेले अनेक अल्पोपाहाराचे पदार्थ, भात-पुलावाचे विविध प्रकार, तसेच सार-करी यांचा समावेश आहे व त्यासोबत लागणार्या चटण्या, कोशिंबिरी-रायतीही आहेत. नारळाचे विविध गोड पदार्थही पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकामुळे रसिकांना नारळाचे वैशिष्टयपूर्ण पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.
Reviews
There are no reviews yet.