465 | 978-93-89458-38-1 | Udyog Sanch | उद्योग संच | यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली | Suresh Haware | सुरेश हावरे | कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी…
उद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँिंडग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल… उद्योग करावा ऐसा… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक… स्टार्टअप मंत्र तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’! |
पेपरबॅक | Book | Rohan Prakashan | Marathi | Self-Help | Informative | माहितीपर | UdyogSet.jpg | UdyogSteBC.jpg |
उद्योग करावा ऐसा
२१ उद्योजकांशी साधलेल्या संवादातून उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स
सुरेश हावरे
‘उद्योग तुमचा, पैसा दुसर्याचा’ या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक ‘पुस्तक-मंत्र’ घेऊन येत आहेत.
हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर झालेल्या ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’चं संपादित स्वरूप. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता. या ‘शो’मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणार्या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या. तब्बल 72 लाख लोकांनी हा ‘शो’ बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरू केले.
हावरे हे स्वत: अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या. या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले ‘मॅनेजमेंट थॉटस्’ हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात.
ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या ‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.
नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक… उद्योग करावा ऐसा !
Reviews
There are no reviews yet.