368 | 978-93-86493-52-1 | Thora-Mothyancha Balpan Sanch | थोरा-मोठ्यांचं बालपण संच |
डॉ.गणेश राउत /उल्का राउत
|
आपण भविष्यात कोण होऊ, काय करू
याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या, अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात. मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा… ३ पुस्तकांचा संच कलामांचं बालपण अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर, आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती, कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि अध्यात्मिक प्रवृत्ती… एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक… थोरांचं बालपण या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य, समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील; ४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे. आमचं बालपण या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 340 | 21.8 | 14.5 | 2.3 | 430 | किशोरवाचन | Combo Sets | पुस्तक संच | Young Adult | किशोरसाहित्य | 325 | ThoraMothyancheBalpanSetcover | Thoramothyancha BalpanSetcoverBC.jpg |
इम्प्रेसिव्ह इंग्लिश
बी.के. गर्दे
व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता
- नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल.
- नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्यांसाठी.
- व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी.
- परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी
- इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
- चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी.
- भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
- कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.