978-93-92374-19-7 | The Zero Cast Mission | द झीरो-कास्ट मिशन | Amar Bhushan | अमर भूषण | प्रणव सखदेव | द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट ! |
Papar Back | Book | Rohan Prakashan | मराठी | कथासंग्रह | २५० |
मालगुडीचा संन्यासी वाघ
[taxonomy_list name=”product_author” include=”354″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”401″]
आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!
गावतल्या कोंबड्या-बकर्या-म्हशींची शिकार करून गावकर्यांना त्रास देणार्या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. या `हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या `सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!
थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात.
या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते.
`मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा…मालगुडीचा `संन्यासी’ वाघ!
Reviews
There are no reviews yet.