978-3-92374-34-0 | Story Tailor | स्टोरी टेलर | Gajendra Ahire | गजेंद्र अहिरे | स्टोरी’ टेलर’ हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी दिग्दर्शकाचा सर्जनशील प्रवास होय. दिग्दर्शक म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या साठ चित्रपटांपैकी १२ निवडक चित्रपटांच्या निर्मितीमागच्या कथा हे पुस्तक सांगतं. कथालेखन, निर्मात्याचा शोध, कलाकार निवड, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, प्रसिद्धी अशा अनेक आघाड्यांवर चित्रपट दिग्दर्शकासमोर असलेली आव्हानं या पुस्तकातून आपल्याला समजतात. प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीशी अनेक रंजक किस्से आणि बरे-वाईट अनुभव यांचं नातं जुळलेलं असतं… ते किस्से, ते अनुभव सांगता सांगता गजेंद्र दिग्दर्शक म्हणून या सगळ्या सिनेमांच्या ‘मेकिंग ‘कडे पुन्हा एकदा बघतात आणि स्वतःला तपासतात. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आघाडीचे कलाकारही पुस्तकात या स्टोरी’ टेलर ‘विषयी मनमोकळेपणे बोलतात. एकंदर सांगायचं तर, सिनेरसिक आणि अभ्यासक यांच्या हाती या पुस्तकाच्या निमित्ताने मोठा ऐवज पडणार आहे. तो ऐवज चित्रपटरसिकांना रंजक तर वाटेलच; पण त्याचबरोबर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणारे आणि चित्रपटनिर्मितीच्या वेगवेगळ्या विभागांत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच या क्षेत्रातले नवोदित अशा सगळ्यांसाठी स्टोरी’ टेलर’ जणू संग्राह्य असं ‘गाइड’ही ठरणार आहे. |
paper back | book | Rohan Prakashan | Marathi | व्यक्तीरंग | cinema | चित्रपटविषयक |
माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन
नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : प्रणव सखदेव
तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.
Reviews
There are no reviews yet.