378 | 978-93-86493-57-6 | Startup Mantra | स्टार्टअप मंत्र | स्टार्टअप मंत्र अर्थात नवोद्योगाची ओळख | Suresh Haware | सुरेश हावरे | तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप! अभिनव संकल्पना किंवा आयडिया, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं जातं.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्यं : १५ यशस्वी उद्योजकांशी संवाद : स्टार्टअप्सच्या संकल्पना, त्यांची अंमलबजावणी आणि विस्तार होण्यापर्यंतचा प्रवास प्रथितयश व सर्जनशील उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांचे अनुभवाचे बोल व मार्गदर्शन यशस्वी स्टार्टअप्सची १० सूत्रं आणि मौल्यवान टिप्स एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 116 | 21.5 | 14 | 1 | 180 | Business | व्यवसाय | 150 | StartupMantracover | StartupMantracoverBC.jpg |
उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा
व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे, वृत्ती हवी!
[taxonomy_list name=”product_author” include=”507″]
आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे.
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.
जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील.
‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील
Reviews
There are no reviews yet.