344 | 978-93-86493-26-2 | Shishtaeche Indradhanu | शिष्ठईचे इंद्रधनू | डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग | Vijay Naik | विजय नाईक | शिष्टाईचं अर्थात डिप्लोमसीचं विश्व म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनूच. या विश्वाचे रंग, ढंग आणि विविध पैलू चार दशकांहून अधिक काळ दिल्लीत वास्तव्य असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत. या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी किंवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाऱ्यांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे. डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाऱ्या एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा कॅलिडोस्कोप म्हणजेच…शिष्टाईचे इंद्रधनू ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 188 | 21.5 | 13.9 | 0.9 | 240 |
The Author, a senior journalist, has been closely observing the external affairs of India. We has candidly written about the diplomacy, the etiquette followed, the hidden meanings of it. He has shared with us many unforgettable and many a times humorous experiences in past years
|
Political | राजकीय | Informative | माहितीपर | 225 | Shishtaiche Indradhanu Cover4 | ShishtaicheIndradhanuCoverBC.jpg |
राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट?
[taxonomy_list name=”product_author” include=”575″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”351″]
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान निघृण हत्या झाली. निवडणुकीनंतर ते सत्तेत येतील या भीतीने श्रीलंकेतील एलटीटीई या संघटनेने राजीव यांची हत्या केली असावी, असं मानलं जातं आहे. परंतु या मूळ गृहीतकावर प्रश्नचिन्ह उपास्थित केलं, तर वेगळीच परिस्थिती समोर येते. लेखक व पत्रकार फराझ अहमद यांनी या पुस्तकातून या गृहीतकावर प्रश्नचिन्ह निर्माण करून राजीव गांधी हत्या प्रकरणातील वेगवेगळ्या कंगोर्यांवर प्रकाश टाकला आहे. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत आला हे खरं, पण सहानुभूतीचं वातावरण निर्माण होऊनही पक्षाला स्पष्ट बहुमतही मिळवता आलं नव्हतं; हे लक्षात घेतलं, तर राजीव गांधी यांच्या सत्तेत परत येण्याची भीती एलटीटीईला वाटत होती, ही मांडणीच कोसळते. याचा ऊहापोह फराझ पुस्तकात करतात. मग त्यांची हत्या का झाली असावी, याचा शोध घ्यायचाही ते प्रयत्न करतात.
राजीव गांधी यांच्या हत्येचा कथित मुख्य सूत्रधार शिवरासनने हत्येनंतर भारतातच थांबण्याचा निर्णय का घेतला? त्याला भारतातच कोणी थांबवून घेतलं? आपल्या सुरक्षेसाठी तो कोणावर विसंबून होता? जाफन्याला परतायची त्याला का भीती वाटत होती? असे प्रश्न या पुस्तकात लेखकाने उपस्थित केले आहेत.
राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यामुळे कोणाचा राजकीय फायदा झाला याचाही शोध हे पुस्तक घेतं. फराझ यांनी असा दावा केला आहे की, तत्कालीन राजकीय परिस्थितीतीच राजीव गांधींच्या हत्येमागील खर्या कटावर पांघरूण घालण्यासाठी जबाबदार होती.
जगभरातल्या भयंकर हत्याकांडांपैकी एक असलेल्या या प्रकरणाची दुसरी बाजू मांडण्याचा आणि त्याबाबतचे प्रश्न उपस्थित करण्याचा हा प्रयत्न… अर्थात् राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट?
Reviews
There are no reviews yet.