299 | 978-93-82591-93-1 | Shanti Yog | शांती योग | योग साधनेची प्राथमिक,माध्यमिक आणि प्रगत वाटचाल | Geeta Iyengar | गीता अय्यंगार | योग ‘ हा विषय तसा अवघडच . कारण ते एक दार्शनिक तत्त्वज्ञान आहे . यामध्ये बुद्धीला पटलेले तत्त्वज्ञान स्वअनुभवानेच सिद्ध करायचे असते . प्रयोग करायचा असतो तो स्वत : वरच ; तेही आत्मज्ञानासाठी , मुक्तीसाठी … हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भीती मनात बाळगण्याचे कारण नाही . योगामुळे जीवन जगण्या – अनुभवण्याची कला अवगत होऊ शकते तसेच जीवनविषयक तत्त्वज्ञानाची ओळख होऊ शकते . म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला ‘ योग ‘ दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय ; परंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरुजींनी ( योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार ) सोप्या शब्दांत मांडणी करून ठेवली आहे . त्याचेच विवेचन गीता अय्यंगार यांनी या पुस्तकात समर्थपणे केले आहे . या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे ; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे , त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केले आहे . त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते . या पुस्तकाचे वाचन , मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल . | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 308 | 21.7 | 14 | 1.7 | 340 |
Yoga is very effective therapy for todays lifestyle. Geeta Iyangar, has impressively narrated the importance of Yoga (as a branch of philosophy) and has guided Yogasadhakas who are learning Yoga at a advance level.
|
Yoga | योग | 300 | Shantiyog | Shantiyog_back_coverBC.jpg |
योगोपचार
योगमहती अधोरेखित करत विविध आरोग्यसमस्या निवारणासाठी उपयुक्त मार्गदर्शन
शब्दांकन : गीता अय्यंगार
योग म्हणजे जीवन जगण्याची कला. योगाची अनेक रुपं व पैलू आपल्या जीवनाला समृद्ध करतात. त्यात जगण्यातली सहजता, मोकळेपणा, आल्हाददायकता, सचोटी आणि मनोविकास या पैलूंचा समावेश तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचा पैलू योगाबरोबर जोडला गेला आहे, तो म्हणजे आरोग्य!
वयानुसार उद्भवणारे शारीरिक, मानसिक विकार आणि जन्मतःच असणारे दोष, अशा दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. खरं म्हटलं तर योग ही जणू नैसर्गिक देणगीच मानवजातीला लाभलेली आहे. या दृष्टिकोनातून योगमहती सांगता सांगता लेखकाने…
■ लहानपणापासूनच स्वतःला घडवण्याचं तंत्र
■ प्रौढवयात येणारं अग्निमांद्य
■ उच्च रक्तदाब
■ मधुमेह
■ उतारवयात येणारे हृदयरोग
■ त्वचेचे विकार
■ स्त्रियांच्या आरोग्यसमस्या
… अशा अनेक आरोग्यसमस्यांवर प्रचलित योगासनांचे उपचार या पुस्तकात सुचवले आहेत. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील काही साधनांचा उपयोग करून अथवा आधार घेऊन योग करण्याची क्रिया आणि कृतीही दिल्याने शारीरिक मर्यादा असणाऱ्यांनाही हे योगोपचार अतिशय सुलभतेने आणि उत्तमरीत्या साधता येतील. योगाला आयुष्य वाहिलेल्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी मराठी माणसाच्या सोयीसाठी मराठीत साकारलेलं पुस्तक… योगोपचार !
Reviews
There are no reviews yet.