327 | 978-93-86493-07-1 | Shahamrugachya Tavadit ani Itar 6 katha | शहामृगच्या तावडीत आणि इतर ६ कथा | भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता | Ruskin Bond | रस्किन बाँड | Rama Hardikar-Sakhdeo | रमा हर्डीकर-सखदेव | सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात. त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं, त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या कथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी ! तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल… तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 143 | 21.6 | 13.9 | 1 | 220 | Thirty nine unforgettable tales of fascinating human encounters with animals and birds-of a man-eater that terrorizes an entire village; a strange and wonderful trust that develops between a fierce leopard and a boy; revengeful monkeys who never forgive a woman who grows dahlias; a crow who genuinely thinks human beings are stupid; and many others-creating a world in which men and wild creatures struggle to survive despite each other: a world where, in the end, one is not quite sure which side one is on. Another marvellous collection of stories from India’s most-loved author that will once again amuse, enchant and delight children of all ages. |
किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | 150 | Shahamrugachya_tavdit_Ruskin_Bond_ | SahmrugachyaTawditBC.jpg |
केदारनाथची किमया आणि इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. फेलूदाला हिरो मानणार्या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा ‘जहांगीरच्या सुवर्णमुद्रा’ असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर? कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्याला?
३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट – त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट! पण त्यावर अनेकांचा डोळा असतो… फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण ‘केदारनाथची किमया’ घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो…!
Reviews
There are no reviews yet.