978-93-92374-44-9 | Samarthanchi Olakh | समर्थांची ओळख | Narayan Dharap | नारायण धारप | समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप
समर्थ मालिका समर्थ कथा नव्या स्वरुपात ! |
paper back | Book | Rohan Prakashan | मराठी | 288 | 21.5 | 13.3 | 1.5 | Mohor | Fiction | कथासंग्रह | 400 |
घनगर्द
हृषीकेश गुप्ते
हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.
ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.
त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी
मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.
हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.
तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.
महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.
म्हणूनच त्याच्या कथांमध्ये
एक चैतन्य सळसळताना जाणवतं.
‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून
हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.
ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे
भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.
मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.
त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.
पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.
याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.
– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)
Reviews
There are no reviews yet.