978-93-92374-48-7 | Samarthana Avhaan | समर्थांना आव्हान | Narayan Dharap | नारायण धारप | समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप
समर्थ मालिका समर्थ कथा नव्या स्वरुपात ! |
paper back | Book | Rohan Prakashan | मराठी | 342 | 21.5 | 13.3 | 1.7 | Mohor | Fiction | कथासंग्रह | 500 |
केदारनाथची किमया आणि इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. फेलूदाला हिरो मानणार्या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा ‘जहांगीरच्या सुवर्णमुद्रा’ असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर? कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्याला?
३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट – त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट! पण त्यावर अनेकांचा डोळा असतो… फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण ‘केदारनाथची किमया’ घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो…!
Reviews
There are no reviews yet.