Reading Time: <1 Minutes ([wp-word-count] words)
pranav sakhadeo 5 books set sanch
₹1,115.00 ₹849.00
₹1,115.00 ₹849.00
२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ५ पुस्तकांचा संच
१) काळेकरडे स्ट्रोक्स (युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी) = रु.२५०
२) ९६ मेट्रोमॉल = रु.१५०
३) निळ्या दाताची दंत कथा = रु.२५०
४) नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य = रु.२५०
५) दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट = रु.२४०
रु.१,११५ ची पुस्तकं सवलतीत रु.८४९ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
Reading Time: <1 Minutes ([wp-word-count] words)
pranav sakhadeo 5 books set sanch
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या २ कथा…
१. एकदा बाजारात फेलूदाची भेट जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाशी होते. फेलूदाचा चाहता असल्याने तो त्याला अचानक पिंजर्यातून गायब झालेल्या त्याच्या पोपटाचा शोध घेण्याची विनंती करतो. म्हणून फेलूदा त्याच्या घरी जातो. तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो, आणि मौल्यवान असलेलं ‘नेपोलियनचं पत्र’ही गायब होतं. फेलूदाला पोपटाच्या पिंजर्यावर रक्ताचे डागही सापडतात…!
२. जगप्रसिध्द चित्रकार टिंटोरेट्टोचं एक चित्र चित्रकार चंद्रशेखर यांना भेट मिळालेलं असतं. त्या चित्राची किंमत काही लाखांमध्ये असते. वारसा हक्काने त्या चित्राचे हक्क चंद्रशेखर यांच्या मुलाकडे असल्याने चित्र पाहण्यासाठी तो चुलतभावाकडे – नवकुमार यांच्याकडे येतो. तेव्हाच घरातल्या एका म्हातार्या कुत्रीचा ‘खून’ होतो. तपासात फेलूदाला कळतं की, ते चित्र बनावट आहे! खर्या चित्राचा शोध घेत फेलूदा पोहोचतो थेट हाँगकाँगला …’टिंटोरेट्टोच्या येशू’च्या शोधात!
रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा
बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.
व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.
व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.
निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
संचात असलेली ४ पुस्तकं :
१. द इंग्लिश टीचर
२. द बॅचलर ऑफ आर्टस
३. मालगुडीचा नरभक्षक
४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…
अनुवाद :
आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!
गावतल्या कोंबड्या-बकर्या-म्हशींची शिकार करून गावकर्यांना त्रास देणार्या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. या `हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या `सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!
थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात.
या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते.
`मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा…मालगुडीचा `संन्यासी’ वाघ!
Reviews
There are no reviews yet.