978-93-92374-62-3 | Nilya rangache Rajvaekhi Phulpakharu | निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू | Shobha Bhalekar | शोभा भालेकर | अनुजा जगताप | एकूण आठ कथांचा हा वाचनीय असा कथासंग्रह. या कथा अतिशय तरल आणि जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, पात्र या कथांमध्ये भेटत राहतात. गुंगवून टाकणाऱ्या शैलीतून लेखिका शोभा भालेकर घराघरातल्या अनेक बोलक्या कहाण्या सांगतात. काही पात्रांमध्ये आपण आपल्यालाच शोधत राहतो तर काही प्रसंग जे आपल्याही आयुष्यात घडून गेलेले असतात त्यांचाही आपल्याला पुनःप्रत्यय येत राहतो, तसे प्रसंग नव्याने समोर आल्यामुळे आपण काहीसे चकितही होतो. आपण थोड्या सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने जर आयुष्य बघू लागलो तर किती सुंदर, लोभसपणे जगता येऊ शकेल याची प्रचीती नकळतपणे कथांमधून येत जाते. प्रत्येक वाचकाला गुंतवून ठेवणारा
विविधरंगी कथांचा संग्रह…. निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू ! |
paper back | Book | Rohan Prakashan | Marathi | 174 | mohor | 250 |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १
प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.