184 | 978-93-80361-57-4 | Navinyapurna Badal Ghadavatana | नावीन्यपूर्ण बदल घडवताना | ११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या… त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास… | Porus Munshi | पोरस मुंशी | John Colaco | जॉन कॉलोसो | दुसर्यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे. अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत… त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल… ‘‘नावीन्यपूर्ण बदलांमागील वैचारिक प्रक्रिया या पुस्तकात अधोरेखित केली आहे हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. लेखनपद्धतही अभिनव असल्यामुळे ते मनाला अधिक भिडतं. हे लिखाण प्रेरक असून या आगळ्या वाटा अनेकांना अनुकरणीय वाटतील.’’ – रतन टाटा | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 272 | 20.5 | 13.7 | 1.5 | 300 |
Success stories of 11 Indian organisations who succeeded with innovative approach
|
Self – Help | व्यक्तिमत्व विकास | Business | व्यवसाय | 230 | Badal Ghadavatana.jpg | Navinyapurna Badal GhadavatanaBC.jpg |
तुम्हाला ब्युटीपार्लर चालवायचंय?
माया परांजपे
आजचं युग फॅशनचं आहे. सर्वत्र फॅशनचे महत्त्व वाढले आहे. चित्रपट, परदेशांशी वाढता संपर्क अशा अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या फॅशन्स, सौंदर्य-प्रसाधने इत्यादींचे महत्त्व फारच वाढत चालले आहे. अशा कारणांमुळे स्त्रिया ‘ब्युटीपार्लर’ चालवावयास लागल्या आहेत. काही स्त्रिया आपल्या घरातच ‘ब्युटीपार्लर’ (लहान प्रमाणात) चालवतात व पैसे मिळवतात. अशा परिस्थितीत स्त्रियांना ‘ब्युटीपार्लर’ चालवताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे पुस्तक लिहिले.
ब्युटीपार्लरसाठी जागा, आर्थिक मदत, ब्युटीपार्लरची ठेवण, त्यासाठी लागणार्या गोष्टी, ब्युटीपार्लरची आंतररचना इ. सर्व माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस उत्तम ब्युटीपार्लर चालविता येईल.
Reviews
There are no reviews yet.