481 | 97-89-38649-36-82 | Navi Surwat | नवी सुरवात | Raju Deshpande | राजू देशपांडे | चित्रं आणि शब्द यांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देणारं , वेगळा – ‘ आउट ऑफ द बॉक्स ‘ – विचार करायला लावणारं चित्र – पुस्तक . या पुस्तकामधून मुलांना रंजक पद्धतीने वेगवेगळे आकार , रंग यांची ओळख होईल . त्यांना चित्रवाचनाचीही गोडी लागेल . चित्रांमुळे मुलांची दृश्यभाषा , तर मजकुरामुळे त्यांची विचारदृष्टी विकसित व्हायला मदत होईल . मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावीत , पाहावीत आणि यातल्या चित्रगोष्टींचा आनंद घ्यावा ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 15 | 60 | NaviSuruwat.jpg | NaviSuruwatBC.jpg |
शेरू
[taxonomy_list name=”product_author” include=”558″]
शेरू तसं सांगायला वाघाचं पिल्लू पण खरं तर आम्हा भावंडांपैकीच एक वाटायचा तो आम्हाला. जरा जास्तच लाडका, लाडावलेला. खायला, खेळायला, फिरायला, मस्ती करायला तो आमच्याबरोबर असायचाच; पण गप्पा मारताना, गोष्ट सांगता-ऐकतानाही तो असणं आवश्यक असायचं. निदान त्याला तसं वाटायचं. बोलताना मधे मधे त्याचं नाव घेतलं नाही तर त्याला वाईट वाटायचं. ते त्याच्या चेहर्यावर दिसायचंच. आवडीच्या खेळात त्याचा चेहरा अगदी हसरा व्हायचा, इतका की मिशा वर जायच्या आणि दु:खाची गोष्ट ऐकताना शेरूचे सुस्कारे सगळ्यात मोठयाने ऐकू यायचे. त्याला आमच्या आधीच खाऊ द्यावा लागायचा आणि वर मोठयानीही आपल्या वाटणीतून त्याला आणखी द्यावं असं जणू सांगत तो समोरच बसे. आम्हाला खेळायलाही ओढून नेई. आणि तरी…
Reviews
There are no reviews yet.