286 | 978-93-82591-78-8 | Nandanvanatil Dhoka + 2 Katha | नंदनवनातील धोका व इतर २ कथा | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या ३ कथा… १. माहितोष रॉय यांना धमकी देणाया चिठ्ठ्या वारंवार येत असतात. चौकशीअंती फेलूदाला असं समजतं की, काही दिवसांपूर्वीच एका नटाच्या बदल्यात रॉय यांना ‘अप्सरा थिएटर’ या कंपनीत घेतलेलं असतं. त्यामुळे तो नट त्यांच्यावर चिडलेला असतो. तसंच वडिलोपार्जित मालमत्तेत पुरेसा हिस्सा न मिळाल्याने रॉय यांच्या सख्ख्या भावाचाही त्यांच्यावर राग असतो. फेलूदाच्या चातुर्याचा कस लागतो अप्सरा थिएटर प्रकरणात! २. फेलूदा, तपेश आणि लालमोहनबाबू काश्मीरला फिरायला जायचं ठरवतात. तिथे त्यांची ओळख माजी न्यायाधीश मलिक यांच्याशी होते. मलिक हे शिक्षा दिलेल्यांच्या आत्म्यांशी संवाद साधतात आणि त्यांनी दिलेली शिक्षा योग्य होती की नाही, हे पडताळून पाहतात. अचानक फेलूदावर हल्ले व्हायला सुरुवात होते, आणि मलिक यांची निर्घृण हत्या केली जाते. आणि समोर उभा राहतो – नंदनवनातील धोका! ३. लखनौला जाताना फेलूदाची श्रीयुत बिश्वास यांच्याशी ओळख होते. त्यांच्या घराण्याचा रंजक इतिहास ऐकताना असं समजतं की, एकेकाळी प्रसिद्ध असलेली नटी शकुंतला यांचा कंठहार त्यांच्याकडे जपून ठेवलेला आहे. एके दिवशी तो हार अचानक गायब होतो. पण मौल्यवान असलेला शकुंतलेचा कंठहार फेलूदा ‘युक्ती’ने शोधून काढतो! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 168 | 18 | 12.2 | 0.8 | 120 | Film Director and writer Satyajit Ray wrote Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter. The plots involve murder, intrigue and narrated in racy, humorous style. The locales range from Kashmir to London. Each mystery and its solution makes for enormously entertaining fare! |
किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | 125 | NandanvanatilDhokaFeluda_Golden_2 | NandanvanatildhokaBC.jpg |
द इंग्लिश टीचर
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
व्यवसायाने शिक्षक असणार्या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पत्नी-पत्नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल…
Reviews
There are no reviews yet.