417 | 978-93-86493-90-3 | Murder In Mahim | मर्डर इन माहीम | Jerry Pinto | जेरी पिंटो | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | माटुंगा रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये सापडलेला एका तरुणाचा मृतदेह आणि तिथून सुरू झालेला शोधाचा एक प्रवास… क्षणोक्षणी वेगळ्याच व्यक्तींकडे वळणारी संशयाची सुई आणि या प्रवासात सतत येणारी अनपेक्षित वळणं !
इन्स्पेक्टर झेंडे आणि निवृत्त पत्रकार पीटर डिसूझा यांच्या या शोधप्रवासात उलगडते – ‘मुंबई’ या मायानगरीच्या पोटात दडलेली एक वेगळीच दुनिया…यातलं ‘गे’ व्यक्तींचं जग, त्याला असणारी अनेक अस्तरं ! इथली अगतिकता…शत्रुत्व…स्पर्धा… मैत्री…क्रौर्य…अशा अनेक भावनांचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते. संवेदनशील पत्रकार आणि प्रतिभावान लेखक जेरी पिंटो यांचं मानवी नातेसंबंधांतल्या अनेक कंगोऱ्यांचा वेध घेणारं आणि ‘अस्वस्थ’ मुंबईचं वास्तव दर्शन घडवत एका खुनाच्या मुळाशी जाणारं… मर्डर इन माहीम ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 299 | 22 | 14 | 1 | 240 | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 250 | MurderinMahimcoverfinal | MurderinMahimcoverfinalBC.jpg |
मालगुडीचा नरभक्षक
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
व्यवसायाने शिक्षक असणार्या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पत्नी-पत्नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल…
Reviews
There are no reviews yet.