398 | 978-93-86493-71-2 | Mulansathi Giryarohan | मुलांसाठी गिर्यारोहण | ट्रेकिंग, माउंटेनिअरिंगचे सुरवातीचे धडे | Umesh Zirpe | उमेश झिरपे | भटकंती करायला कुणाला आवडत नाही?
स्वच्छ मोकळी हवा, झाडं, नद्या पाहत मनसोक्त फिरणं ही अगदी आनंदाची गोष्ट असते. डोंगर-दऱ्यांतून किंवा जंगलात भटकायला तुम्हाला आवडतं ना? ट्रेकिंग करताना कित्ती नवीन गोष्टी कळतात, माहिती आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून… झाडं-वेली-पक्षी, नद्या, मातीचे प्रकार… एक नवी दुनियाच तुमच्यासमोर उभी राहते. गिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते, कोणत्या साधनांची आवश्यकता असते, याबाबत निष्णात गिर्यारोहक आणि एव्हरेस्टसह अनेक गिर्यारोहण मोहिमांचे लिडर उमेश झिरपे यांनी केलेलं हे मार्गदर्शन… मुलांसाठी गिर्यारोहण |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 44 | 21.6 | 14 | 0.4 | 50 | किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | Others | इतर | 75 | MulansathiGiryarohancover | MulansathiGiryarohanBC.jpg |
आमचं बालपण
[taxonomy_list name=”product_author” include=”561″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]
बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’
Reviews
There are no reviews yet.