472 | 978-93-82591-14-5 | Mukkam Post Shahapur | मुक्काम पोस्ट शहापूर! | Shobha Bhalekar | शोभा भालेकर | ही कथा केवळ एका गावाची नाही!
ती आहे, रम्य आणि सुखद आठवणींची… लहानशा गावात सहज मिसळून गेलेल्या एका कुटुंबाची ही कथा कुटुंबातल्या मुलीच्या आठवणींतून उलगडत जाते. जात, धर्म, पंथ या गोष्टींचा जाच होऊ न देता सुखं-दुःखं, मान-अपमान, सण-उत्सव, भांडण-तंटे अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन वाटून घेत माणुसकी आणि आपलेपणा जिता-जागता ठेवणाऱ्या गावातल्या आयुष्याच्या या आठवणी निरलस वृत्तीचं दर्शन वाचकाला घडवतात. द्वेष आणि मत्सराचे वारे न लागलेल्या काळात, तांत्रिक सुविधांचा सुकाळ नसताना छोट्याशा गावातली माणसं एकमेकांना कशी धरून राहत होती, एकमेकांच्या चुकांसह किती सहजपणे एकमेकांना स्वीकारत होती, याची ही गोष्ट! सादगी, निर्लेप वृत्ती आणि जिव्हाळा या गोष्टींच्या आधारावर सकस आणि सुंदर जीवन जगलेल्या गावाच्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या या आठवणी! मुक्काम पोस्ट शहापूर! |
Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 96 | 125 | MukkamPostShahapur.jpg | MukkamPostShahapurBC.jpg |
बातमीमागची बातमी
खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य
[taxonomy_list name=”product_author” include=”366″]
हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’
Reviews
There are no reviews yet.